Ad will apear here
Next
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग सहा


लेखमालेच्या सहाव्या भागात आज आपण ऋचा क्रमांक सहा व सात यांचा अभ्यास करणार आहोत. मी मागेच सांगितल्याप्रमाणे श्रीसूक्त हे ऋग्वेदातील एक अतिशय प्रभावी सूक्त असून ते स्तुतिपर आहे. श्रीसूक्ताची प्रत्येक ऋचा ही मंत्रमय आहे असं म्हटलं, तरी ती अतिशयोक्ती होणार नाही हे सत्य आहे.

आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः ।
तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ॥६॥

या ऋचेचा सोपा-सरळ अर्थ म्हणजे जिची कांती-वर्ण हा सूर्यासारखा तेजस्वी आहे, अशा श्रीलक्ष्मीदेवीच्या तपोबलाने ज्याची निर्मिती झाली असा बिल्व (बेल) वृक्ष, त्याची फळे ही त्या तप:सामर्थ्यबलाने माझ्या आयुष्यांतील अलक्ष्मी (अज्ञान व दारिद्र्य) यांचा समूळ नाश करोत. बेलाची पाने (त्रिदळे) आपण दर सोमवारी शंकराच्या पिंडीवर अर्पण करतो; पण बेलाचा वृक्ष आणि लक्ष्मी यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. सत्ययुगातील एका पुराणकथेनुसार श्रीलक्ष्मीने श्रीशैल्यपर्वतावर बेलाच्या वृक्षाच्या रूपात भगवान श्रीशंकरांची आराधना करून श्रीमहाविष्णूंच्या विषयी मनात असलेला गैरसमज दूर केला होता. त्यामुळे बिल्ववृक्ष श्रीलक्ष्मीचेच स्वरूप मानला जातो. ज्यांना शक्य आहे अशांनी घराच्या आवारात ईशान्य, पश्चिम व आग्नेय यापैकी कोणत्याही दिशेला बेलाचे झाड लावणे अतिशय भाग्योदयकारक मानले जाते. बेलाच्या झाडाखाली श्रीसूक्ताचे पाठ करणे हे सप्तजन्मांतील दारिद्र्य दूर करून संपत्ती प्रदायक मानतात. बेलाच्या पानाने श्रीशिवांना अभिषेक करणे (बिल्वार्चन) हे आध्यात्मिक व आधिदैविक दोष नाहीसे करणारे आहे.

उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह ।
प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥७॥

या सातव्या ऋचेमध्ये देवसख: (म्हणजे देवांचा मित्र व शिवभक्त कुबेराचा) उल्लेख असून, मणिना (म्हणजे चिंतामणी, असा मणी की ज्याच्या अस्तित्वाने चिंताहरण होते व मनोकामना पूर्तता होते) या ऋचेचा अर्थ असा आहे, की या श्रीसूक्ताच्या दैनंदिन पठणाने मला कुबेराप्रमाणे धनसंपत्ती, जडजवाहिर प्राप्त होवो. चिंतामणीची प्राप्ती होवो आणि मी ज्या राष्ट्रात, देशात जन्म घेतला आहे त्या ठिकाणी, त्या देशात मला कीर्ती, सुप्रसिद्धी प्राप्त होऊन माझा उत्कर्ष होवो. 

पूर्वीच्या काळी देश सोडून इतरत्र जाणे याला ‘देशोधडीला लागला’ असं म्हणण्याची प्रथा होती. आता काळानुसार हे संदर्भ बदलले आहेत. आता देश सोडून युरोप-अमेरिकेला जाणं हे प्रतिष्ठेचं मानलं जातं... पण तुम्ही ज्या देशात, राष्ट्रात जन्म घेतला आहे, तिथे तुमची प्रगती व भरभराट होणं हे इथे या ऋचेत अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे इथे ज्याला संपत्ती, धन व ऐश्वर्यासोबत इच्छापूर्ततेचीही सांगड घातलेली आहे, असं आपल्या लक्षात येतं. आपल्याला श्रीसूक्त रेग्युलरली पाठ करून रोज म्हणायचे आहेच; पण यातली ही सातवी ऋचा ही सर्वसामान्य माणसाला जे आयुष्याकडून अपेक्षित आहे त्याविषयी आहे. त्यामुळे रोज सकाळ-संध्याकाळी कुबेराचे स्मरण करून नुसती ही ऋचा जरी ११ वेळा म्हटली तरी काही अंशी लाभ होतात हे नक्की...

दुसरी एक गंमत सांगतो तुम्हाला. ही सातवी ऋचा म्हणजे...

उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह ।
प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥

अशीच्या अशीच अगदी कानामात्रेचाही फरक न करता, स्वत:च्या हस्ताक्षरात एका वहीत रोज हिरव्या रंगाच्या शाईने (Green Ink) रोज एका पानावर दोन ओळी आहेत तशाच प्रकारे फक्त पाच वेळा लिहून ती वही आपल्या तिजोरीत, तुमचा बिझनेस असेल तर तिथल्या गल्ल्यात किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवून द्यावी. रोज शक्यतो एका ठराविक वेळेला ही ऋचा पाचवेळा लिहायची. कोणतेही बंधन नाही. अगदी आठवडाभर काय महिनाभर खाडा पडला तरी हरकत नाही; पण ती वही जिथे ठेवतो त्या खोलीच्या बाहेर नेऊन लेखन करू नये, प्रवासात वगैरे लिहू नये. रोज वही काढायची, ऋचा लिहून आत ठेवून द्यायची. बास्स बाकी काही नाही; मात्र हिरव्या रंगाच्या शाईनेच लेखन करायचं हे विसरू नका. धनसंपत्तीत वाढ होते आणि बिझनेस असेल तर ट्रेडिंग (व्यापाराचे क्षेत्र) निश्चितपणे वाढते असा अनुभव आहे. एक वही भरली की दुसरी करायची. अशा सात-आठ वह्या झाल्या, की विसर्जन करायच्या. पुन्हा नवी वही आणून लेखन सुरू करायचं.                                                              (क्रमश:)

- सचिन मधुकर परांजपे (पालघर)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LXNXCP
Similar Posts
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग तीन नमस्कार, आजपासून आपण मुख्य विवेचनास सुरुवात करू या. एका भागात एक किंवा दोन ऋचांचा समावेश करून, त्यावर विवेचन देऊन आपण श्रीसूक्त विवेचन पूर्ण करू या, असा माझा मानस आहे. शेवटच्या भागात मी पूर्ण श्रीसूक्त देईन. प्रत्येक ऋचेचा अर्थ जर आपणास नीट समजला, तरच श्रीसूक्त पठणास अर्थ आहे. ऋचेचा अर्थ नीट समजून तो
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग पाच लेखमालेच्या पाचव्या भागात आपण श्रीसूक्तातील ऋचा क्रमांक चार आणि पाच अभ्यासणार आहोत. श्रीसूक्त जसंजसं पुढे सरकत जातं, तसंतसं ते अधिकाधिक परिपक्व आणि स्तुती या अर्थाने परिपूर्ण होत जातं, असं आपल्या ध्यानात येईल. अगोदर आपण ऋचा आणि अर्थ बघून घेऊ या.
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग सात आजच्या भागात आपण श्रीसूक्तातील ऋचा क्रमांक आठ आणि नऊ अभ्यासणार आहोत. या ऋचा पुढीलप्रमाणे आहेत.
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग एक विघ्नहर्ता श्रीगणेश, कुलदैवत श्री लक्ष्मीनारायण/महाकाली आणि सद्गुरूंच्या कृपेने श्रीसूक्त लेखमालेचा आरंभ करतो आहे. श्रीसूक्तावर विवेचन करणं हे माझ्यासारख्या अल्पमती, अल्पबुद्धी आणि सर्वसामान्य व्यावसायिक लेखकाच्या दृष्टीने शिवधनुष्य उचलण्यापेक्षाही दिव्य काम आहे याची पूर्ण जाणीव ठेवून, शक्य तितकं स्वत:च्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language